पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी तोडलेली भिंत 48 तासानंतरही तशीच, युवासेनेचे कुलगुरूंना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीकेसी येथे नुकतीच सभा पार पडली आहे. त्या सभेसाठी मुंबई विद्यापीठाची जागा पार्किंगसाठी वापरण्यात आली होती. त्यासाठी मुंबई विद्यापीठाची एक भिंत तोडण्यात आलेली. सभा आटोपून तीन दिवस उलटले तरी अद्याप ती भींत पुन्हा बांधलेली नाही. त्याप्रकरणी युवासेनेकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून तत्काळ ही भिंत बांधून देण्याची मागणी केली आहे.

टटआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी येणाऱ्या जनतेसाठी गाडी पार्किंगची व्यवस्था मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथे करण्यासाठी तोडलेली भिंत 48 तास उलटुन गेल्यानंतरही अद्याप बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे लगतच असलेल्या मुलींच्या वसतिगृह असल्यामुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तरी सदर भिंत ताबडतोब बांधण्यात यावी अथवा या मुलींच्या सुरक्षेसाठी युवासेना स्वखर्चाने बांधेल याची विद्यापीठ प्रशासनाने नोंद घ्यावी” असा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे.