युवासेनेचा मावळात प्रचाराचा झंझावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मावळ

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी मावळ लोकसभेवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 24 एप्रिलला पिंपरी येथे ”आदित्य संवाद” च्या माध्यमातुन हजारो विद्यार्थी व तरुण वर्गाबरोबर आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. युवासेना कार्यकारिणी सदस्य सिध्देश रामदास कदम यांना मावळ लोकसभा निवडणूक निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले. सिद्धेश कदम हे स्वत: त्यांच्या टीम सोबत तळ ठोकून आहेत. सिद्धेश कदम यांनी मावळ लोकसभा लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रणनीती आखली. नाराज पदाधिकाऱ्यांच्या घरी जावून त्यांची नाराजी दूर करण्यास सिद्धेश कदम यांना यश मिळालेले आहे.

आज कर्जत तालुक्यातील अति दुर्गम भागातील आदिवासी वाड्या रस्त्यांवर पायी पायपिट करून आदिवासी बांधवांशी सवांद साधला. चिंचवडी येथे आजूबाजूच्या आठ ते नऊ आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर सिद्धेश कदम यांना भेटण्यासाठी उपस्थित होते. 10 वर्षे आमदारकी उपभोगत असलेले आमदार सुरेश लाड एकदापण आदिवाशी वाड्यांवर फिरकलेले नाहीत. याबाबत अदिवशी बांधवांनी खात व्यक्त केली.

युवासेना तालुकाअधिकारी व पंचायत समिती सदस्य अमर मिसाळ यांनी स्वखर्चातून 5 ते 6 किमी ची पाण्याची लाईन बसवून चिंचवाडी व आजूबाजूच्या वाड्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. त्याच बरोबर खासदार श्रीरंग बारणे यांनी 16 लक्ष निधी वापरून लाईटची व्यवस्था करून दिली याबाबत आदिवासी बांधवांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले. सिद्धेश कदम यांनी चिंचवाडी व आजूबाजूच्या वाद्यांच्या विकासकामासाठी स्वत: जातीने लक्ष घालण्याचे वाचन दिले. सर्व आदिवासी बांधवांनी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनाचमतदान करणार असल्याची खात्री दिली. यावेळी युवासेना विस्तारक अॅड. वैभव थोरात, संभाजी जगताप, मयूर जोशी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.