
केंद्र सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय, या मिंदे सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय, दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उध्दव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत चिपळूण युवासेनेने भाजप सरकारच्या दडपशाही व हुकूमशाहीच्या विरोधात यल्गार केला.
भाजप सरकार संपूर्ण देशात राज्यांतील सर्व स्थानिक पक्ष संपवण्याचे काम करत आहे. देशात लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे देश वाटचाल करत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज चिपळूण युवासेनेच्या वतीने चिपळूण येथील चिंचनाका येथे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहात पण आमची हिंमत गोठवू शकत नाही असे युवासेना चिपळूणच्या वतीने सांगण्यात आले. एक प्रकारे दडपशाही भाजप सरकार करत आहे. शिवसेनेचे चिन्ह जरी गोठवलत तरी सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहे.
येणाऱ्या निवडणूकीत उध्दव ठाकरे देतील ते चिन्ह घेऊन आम्ही लढू आणि विजयी होऊ हा विश्वास चिपळूण शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शहरप्रमुख राजू देवळेकर, तालुका समन्वयक सुधीर शिंदे, ग्राहक कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, महिला तालुका समन्वयक वेदिका डिके, शहर महिला संघटक वैशाली शिंदे, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश शिंदे, युवातालुका सचिव प्रतिक शिंदे, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपतालुका अधिकारी प्रितम वंजारे, अवधूत शिर्के, महेश शिंदे, संजय चांदे, दिपक मोरे, सागर सावंत, उपशहर अधिकारी विनोद पिल्ले, विनायक रेडिज, ओमकार गायकवाड, आकाश कदम, विभागप्रमुख साहिल शिर्के, शुभम मोरे, वैभव खेतले शुभम जाधव, सुयोग कदम, मनोज शिंदे, विभाग संघटक रोहन आंब्रे, युवासेना समन्वयक रामपूर सतिश जाधव, संकेत नलावडे, उपविभाग प्रमुख नितीन शिगवण, संदेश किंजळकर, नितेश चिपळूणकर, मयुर फटकुरे, अनंत ढापले, महिला आघाडी विभाग संघटक अनामिका हळदारे, राणी महाडीक, युवतीसेना उपतालुका तीर्था लाड, युवासेना अमित कांबळे, महेंद्र कांबळी, राज उतेकर, प्रफुल्ल चाळके, निलेश चव्हाण, प्रसाद कोळगे व युवासेनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































