Video : उदयनराजे समर्थकांचा राडा, डायलॉगवर आक्षेप घेत ‘फाईट’च्या निर्मात्याची गाडी फोडली

सामना ऑनलाईन । सातारा

साताऱ्यामध्ये ‘फाईट’ या चित्रपटाच्या निर्मात्याची गाडी फोडण्यात आली आहे. तसेच चित्रपटाचे पोस्टरही फाडण्य़ात आले आहेत. साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटातील ‘साताऱ्यात फक्त मीच चालतो’ या डायलॉगवर आक्षेप घेत ही तोडफोड़ केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यात फाईट चित्रपटाचे ठिकठिकाणी प्रमोशनल पोस्टर्स लावण्य़ात आले आहे. गुरुवारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राधिका पॅलेस येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यासाठी चित्रपटाचे निर्माते साताऱ्यात आले असता उदयनराजे समर्थकांनी चित्रपटातील ‘साताऱ्यात फक्त मीच चालतो’ हा डायलॉग काढून टाका असे म्हणत गाडी फोडली आणि प्रमोशनसाठी लावण्यात आलेले पोस्टर फाडले.

साताऱ्यात फक्त खा. उदयनराजेच चालतात त्यामुळे तुम्ही पिक्चरमध्ये हा डायलॉग वापरु नका अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.