चंद्रपूर – युवासेनेतर्फे संविधान चौकात बाबासाहेबांना मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती युवासेनेतर्फे शहरातील इंदिरा नगरातील संविधान चौकात युवासेनेचे जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली. विक्रांत सहारे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोला माल्यार्पण करत अभिवादन केले. परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत संविधान चौकात बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे सह रीकी टेंभुरकर, एकनाथ चौरे, प्रफुल उईके, सुशील उईके, आशिष चंदनखेडे, सुनील खोब्रागडे, लखन लांडगे, अनुराग गजघाटे, मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.