राज्यात नवीनच वर्णव्यवस्था अस्तित्वात येऊ पाहत आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च-नीच हा विषय संपलेला नाही, तर तो वाढीला लागला की काय असं वाटतं. अलीकडच्या काळात राज्यात अलीकडे नवीनच वर्णव्यवस्था अस्तित्वात येऊ पहात आहे. मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. हक्कासाठी लढण्याचा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे. परंतु गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कावर गदा आणू पाहत असेल तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार ‘लोकमत’चे संपादक आणि लेखक संजय आवटे यांना छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भुजबळ बोलत होते.

मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्मारकाचा मार्ग ज्या पद्धतीने मोकळा झाला त्याच पद्धतीने महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आनंदाने मोकळा व्हावा, फुले स्मारकासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारादेखील भुजबळ यांनी आज दिला.