
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र उद्योगपती अनंत अंबानी यांनी दीपावलीच्या मुहूर्तावर शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. अंबानी यांनी साई चरणी तब्बल 1 कोटी 51 लाख रुपायांची देणगी अर्पण केली. यावेळी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे त्यांनी हा देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
उद्योगपती अनंत अंबानी यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत केले. अंबानी यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याआगोदार महिनाभरात दोनवेळा त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला होता. आज दीपावली निमित्ताने साई चरणी नतमस्तक होत अनंत अंबानी यांनी साईचरणी 1 कोटी 51 लाखांचा धनादेश अर्पण केला.




























































