बंदीनंतरही प्लॅस्टिक-थर्माकोलचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना नोटीस

28

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्यातील प्लॅस्टिकबंदीनंतरही प्लॅस्टिक व थर्माकोलचे उत्पादन करणाऱ्या दहा कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत लेखी उत्तरात देण्यात आली.

राज्यात प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शिवसेनेचे संजय पोतनीस, तृप्ती सावंत आदींनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सविस्तर माहिती दिली. संभाजीनगरमधील वाळुज रेल्वे स्थानक, चिखलठाणा, पैठण इत्यादी औद्योगिक वसाहतींमध्ये प्लॅस्टिक थर्माकोलचे उत्पादन करणाऱ्या दहा कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात २३ मार्च २०१७ रोजी अधिसूचनेद्वारे प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने हायपॉवर समिती स्थापन केली आहे. प्लॅस्टिक व थर्माकोलवरील बंदी तसेच नियमांमध्ये सुधारणा, भविष्यात नियमात सुधारणा करण्याबाबत ही समिती निर्णय घेईल. प्लॅस्टिकबंदीनंतर पर्यावरणाला पूरक पर्याय उपलब्ध असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या