नाशकात दहा मोरांचा मृत्यू, विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात शनिवार, 28 मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने प्राणी मित्रांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरातील शेतकरी विठ्ठल लाला पगार यांच्या मालकीच्या गट क्रमांक 100 या क्षेत्राला लागून असलेल्या खासगी व ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या परिसरात काही मोर मृत्युमुखी पडले असल्याचे शेतकरी दीपक पगार यांच्या ही बाब निदर्शनास आली.