राज्यात विसर्जनादरम्यान 11 मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात विसर्जनादरम्यान दहा जणांचा मृत्यू झाला. मुंबईत एकाचा, नाशिकमध्ये आठ जणांचा तर गुहागरमध्ये दोघांचा मृत्यू झाला.  जुहू चौपाटीवर विसर्जनासाठी दृष्टी लाईफगार्ड या संस्थेने नेमलेल्या हसन युसूफ शेख (16) या स्वयंसेवकाचा बुडून मृत्यू झाला. नाशिकमध्ये विसर्जनावेळी गोदावरी व वालदेवी नदीपात्रात सात जण बुडाले. यातील चार युवक गोदावरी तर तीन जण वालदेवी नदीपात्रात बुडाले. यातील सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे. नाशिकच्या चुंचाळे शिवारात विसर्जनाच्या मिरवणुकीत ट्रक्टर घुसल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गुहागरमध्ये पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. गणेशमूर्ती असलेल्या वाहनाचे ब्रेक फेल होऊन वाहन मिरवणुकीत घुसले. या अपघातात 17 वर्षाच्या मुलीसह एक प्रौढ मृत्युमुखी पडला असून 5 जण जखमी झाले आहेत.