
सामना ऑनलाईन । डेहराडून
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १८ जण जखमी झाले असून त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही बस उत्तरकाशीहून हरिद्वारला जात असताना सुल्याधार येथे चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस दरीत कोसळली. या बसमधील सर्व प्रवासी हे देवदर्शनासाठी निघाले होते.
14 died & 18 injured out of whom 6 are critical & admitted to AIIMS Rishikesh. Local police, admn, SDRF teams are present at spot. All the injured have been rescued. Operations to recover bodies are underway: Sanjay Gunjyal, IG (SDRF) on bus accident near Suryadhar #Uttarakhand pic.twitter.com/3DJ2UYCOYw
— ANI (@ANI) July 19, 2018
उत्तराखंड राज्य वाहतूक मंडळाची ही बस भाविकांना घेऊन हरिद्वार येथे जात होती. सकाळी आठच्या सुमारास ही बस सुल्याधार येथील चौकात आली. त्यावेळी चालकाच्या डोळ्यावर झोप आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व बस २५० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात १४ जण जागीच ठार झाले तर १८ जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारने प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.





























































