सर्व शक्य आहे! 19व्या वर्षी तरुणीने दिला जुळ्यांना जन्म, दोन्ही बाळांचे वडील मात्र वेगवेगळे

एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्यांना जन्म येणे काही नवीन नाही. अनेकदा पाच किंवा सहा बाळांचाही एकाचवेळी जन्म झाला आहे. परंतु सध्या चर्चा आहे ती ब्राझीलमधील एका तरुणीच्या. येथील एका 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. परंतु दोन्ही मुलांचे वडील मात्र वेगवेगळे आहेत. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून काही लोक याला वैज्ञानिक चमत्कार बोलत आहेत तर काही लोक हे कसे शक्यय असे विचारत आहेत.

ब्राझीलच्या मिनेरिओस (Mineiros) येथील 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. उत्सुकता म्हणून बाळाचे वडील कोण हे जाणून घेण्यासाठी तिने डीएनए टेस्ट (DNA test) केली होती. त्यातून धक्कादायक वास्तव उघड झाले. दोन्ही बाळांचे वडील वेगवेगळे असल्याचे समोर आले असून यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.

डॉक्टरांनी याबाबत बोलताना सांगितले की, अशी घटना लाखो-कोट्यवधींमध्ये एखादवेळी घडते. वैद्यकीय क्षेत्रात क्वचितच अशी घटना पाहायला मिळते. हे हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशनमुळे असू शकते, जी एक जैविक घटना आहे. यामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान बाहेर पडणारे शुक्राणू दुसऱ्या पुरुषाशी संभोग केल्यानंतर त्याच्या शुक्राणू पेशींद्वारे फलित करता येते. गर्भाधारणेनंतर, बाळ त्याची अनुवांशिक सामग्री आईबरोबर सामायिक करते परंतु वेगळ्या प्लेसेंटामध्ये विकसित होते.

दरम्यान, ही घटना पहिल्यांदा आर्चरने 1810 मध्ये दाखवली होती. मानवांमध्ये हे फार क्वचितच घडते. हेटेरोपॅटर्नल कुत्रे, मांजरी आणि गायींमध्ये हे अधिक सामान्य आहे. आतापर्यंत अशी केवळ 20 प्रकरणे झाल्याचे सांगितले जात आहे.

जुळ्या आईचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध

जुळ्या बाळांच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मला आठवले की माझे दुसर्‍या पुरुषासोबतही संबंध होते. मी त्याला डीएनए चाचणीसाठी बोलावले. त्याचा डीएनए दुसऱ्या बाळासोबत जुळला. डीएनए रिपोर्ट बघून मी आश्चर्यचकित झाले. हे होऊ शकते हे मला माहीत नव्हते. माझ्यासोबत असे घडले, असे मला कधीही वाटले नव्हते.