
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतल्या चेंबुर पूर्वेच्या छगन मीठा पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लालचंद ढोलपुरिया (26) आणि जतीन मंडलीक (25) अशी जखमींची नावं आहेत. यातील एक जण पेट्रोल पंपावरील कर्मचारी असून दुसरा पेट्रोल भरण्यासाठी आलेला बाइकस्वार असल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनी या पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून दोन जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



























































