प्राध्यापकांची 2 हजार 88 पदे लवकरच भरली जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेली विविध विषयांची प्राध्यापकांची तब्बल 2 हजार 88 पदेआणि त्यासोबतच प्राचार्यांची पदेही लवकरच भरली जाणार आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या पदांना मान्यता देण्यात आली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील प्राध्यापकांची पदे भरण्याची घोषणा मागील काही महिन्यांपूर्वी केली होती.त्यात त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची 15 हजार पदे भरली जाणार असे स्पष्ट केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्यांची पदे भरण्याला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सामंत यांनी एक ट्विट करून दिली आहे.