
गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. मनपाने शहरात तब्बल 21 ठिकाणी मायक्रो कंटनेन्मेंट झोन घोषित केले आहेत. दरम्यान, कोरोनाकडे कानाडोळा करीत नियमांना ठेंगा दाखवित बेशिस्त नागरिकांनी लग्नसोहळा, अंत्यविधी, भाजीबाजार, हॉटेल या ठिकाणी गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देण्यास सुरुवात केली. नगर शहरात गेल्या सात दिवसांत तब्बल 1 हजार 669 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
नगर शहरात गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मास्क बंधनकारक केला असून, मास्कसंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार मनपा तसेच पोलीस प्रशासनाला दिले आहेत. मनपाने यासाठी चार दक्षता पथकांची नियुक्ती केली असून, मागील चार दिवसांत या पथकांनी सुमारे 53 हजारांची दंडात्मक कारकाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने हॉटेल व रेस्टॉरंट यांना 50 टक्के क्षमतेपेक्षा अधिक गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात तपासणी करण्याची सूचना पोलिसांना केलेली आहे. प्रशासनाने नियम घालून दिलेले असतानाही नागरिकांकडून कोरोनाकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिपाक म्हणून नियंत्रणात असलेला कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वरभूमीवर प्रशासकीय स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसताच जानेवारीपासून नागरिकांनी जमेल त्याठिकाणी नियम मोडण्याचा सपाटा लाकला. गर्दीचे कार्यक्रम करून कोरोनाला निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे आता दररोज कोरोना रुग्णांनी सरासरी त्रिशतक गाठण्यास सुरुकात केली आहे. 17 ते 23 मार्च या कालाकधीत 1 हजार 669 कोरोनाबाधित आढळून आले असून, या कालाकधीत कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला आहे.
बाजारात नियमांची ऐशीतैशी
n किनामास्क, सुरक्षित आंतराकिना असलेल्या बाजारात नियमांची ऐशीतैशी झाल्याचे दिसून येत आहे. शहरात मंगळकार बाजार, चितळे रोड, गंजबाजार, माळीकाडा, प्रोफेसर कॉलनी चौक, केडगाकातील शाहूनगर, अंबिकानगर, भूषणनगर तसेच नकनागापूर येथे भाजीबाजार भरत आहेत. याठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दिनांक रुग्ण
17 मार्च 196
18 मार्च 124
19 मार्च 238
20 मार्च 195
21 मार्च 250
22 मार्च 291
23 मार्च 375


























































