कल्याण-नाशिक रोडवर 23 मजली इमारतीत क्वारंटाईन आयसोलेशन सेंटर

5386

विदेशात सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव असून त्यानुषंगाने 1 मार्च पासून विदेशातून आलेल्या व येणाऱ्या नागरिकांसाठी कल्याण-नाशिक हायवेवर 23 मजली इमारतीत क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात 1000 नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. आयुक्त सुधाकर देशमुख, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्वस्वी प्रयत्न करत आहेत. त्यात 1 मार्च पासून विदेशातून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात आलेल्या नागरिकांचे होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. त्यांचा हातावर तसा शिक्का मारून त्यांना एकांतात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण-नाशिक रोडवर भिवंडी बायपास वर एका 23 मजल्याच्या इमारतीत कॉरंटाईन आयसोलाशन सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात 1000 रूम्स असून उल्हासनगरच्या वतीने 500 व भिवंडीच्या वतीने 500 रूम्स ची विभागून जबाबदारी स्विकारली आहे.

याच इमारतीत विदेशातून विमानतळावर उतरलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारल्यावर त्यांना इथे 14 दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच 1 मार्च पासून उल्हासनगरात आलेल्या नागरिकांची माहिती घरोघरी जाऊन घेण्यात येत आहे.जे आल्याचे निष्पन्न झाले त्यांचीही 14 दिवसांसाठी याच 23 मजल्याच्या इमारतीत व्यवस्था करण्यात येणार आहे. इमारतीची पूर्णतः स्वच्छता, साफसफाई झालेली आहे. तिथे तज्ञ डॉक्टर्स आळीपाळीने 24 तास उपलब्ध राहणार असून पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख,मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या