गेल्या 14 वर्षात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानात 2714 लोकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात 2004 पासून ते आतापर्यंत एकूण 409 ड्रोन हल्ले केले. या ड्रोन हल्ल्यात 2714 लोकांचा मृत्यू झाला तर 728 लोक जखमी झाले. पाकिस्तानमधील मुख्य वृत्तपत्र डॉनने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार सीआयएने बजाऊर, बानू, हांगू, खैबर, खुर्रम, मोहम्मद, वजिरिस्थान मध्ये हे हल्ले करण्यात आले.

सर्वाधिक हल्ले हे 2008 ते 2012 या काळात झाले. या काळात 336 ड्रोन हल्ले झाले व 2282 लोक मृत्यूमुखी पडले तर 658 लोक जखमी झाले.

2010 या वर्षात 117 हल्ले झाले. त्यात 775 जण ठार झाले तर 193 लोक जखमी झाले. 2013-2018 या नवाज शरीफ यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात 65 ड्रोन हल्ले झाले त्यात 301 जण मारले गेले तर 70 जण जखमी झाले. 2018 मध्ये दोन ड्रोन हल्ले झाले, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले होते. 14 वर्षात झालेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-पाकिस्तानचा एक नेता आणि तालिबानचा प्रमुख मुल्ला अख्तर मंसूरही ठार झाला होता.