
सामना प्रतिनिधी । नगर
जिल्हयातील 14 तालुक्यात 480 गावे व 2 हजार 661 वाड्या वस्त्यावरील 10 लाख 58 हजार 826 लोकसंख्येला 22 शासकीय व 651 खासगी टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पंचायत समित पारनेर, पंचायत समिती जामखेड व पंचायत समिती पाथर्डी येथे प्रत्येकी 1 असे एकूण 483 गांवामध्ये व पंचायत समितीच्या पारनेर मधील 35, जामखेडमधील 6, व पाथर्डीमधील 20 मिळून 61 वाड्या वस्त्यांवर म्हणजेच एकूण 2722 वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पंचायत समितीचे कार्यक्षेत्र लक्षात घेता एकूण 11 लाख 26 हजार 826 लोकसंख्येसाठी हा पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात शासकीय 22 टँकर तर खासगी 710 टँकर असे एकूण 732 टँकर धावत आहेत.
तसेच यंदाच्या वर्षी दुष्काळाच्या झळा वाढत असल्याने यंदा मुळा धरणात मागील वर्षी 11539 पाणीसाठी होता. तर यंदा अवघा 5985 एवढाच साठा उपलब्ध आहे. तर भंडारधरा धरणात मागील वर्षी 5212 एवढा होता तर यंदा 1602 आहे. निळवंडे धरणात मागील वर्षी 3048 तर यंदाच्या वर्षी 1144 इतका आहे. यातुन मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा सरासरी टक्केवारीत पाहिला तर मुळा 23.02 % भंडारदरा 14.52% , निळवंडे 13.75% अशी टक्केवारी आहे.
वास्तविक पाहता यंदाच्यावर्षी दुष्काळात खाजगी टँकर जास्त असून शासनस्तरावर एकूण 22 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हयात एकूण 732 खाजगी व शासकीय टँकरने पाणी पुरवठा होत असून अनेकांची तहान या टँकरने भागवली जात आहे. जिल्हयातील तीन मोठ्या व सहा मध्यम प्रकल्पात यंदाच्या वर्षी उपलब्ध असलेला पाणीसाठा चिंताजनक परिस्थितीकडे लक्ष केंद्रीत करणारा ठरला आहे.





























































