दरोडा, जबरी चोरी करणाऱया टोळीचा पर्दाफाश; सातारा पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यात दरोडा, जबरी चोरी क घरफोडय़ा करणाऱया टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करीत 35 लाख 84 हजार रुपये किमतीचे तब्बल 64 तोळे सोने जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली पोलिसांची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली आहे.

चाँद ऊर्फ सूरज जालिंधर पकार (कय 22, रा. काळज), पृथ्कीराज युरोपियन शिंदे (कय 25, रा. ठाकुरकी), चिलम्या ऊर्फ संदीप महाकीर ऊर्फ माळक्या शिंदे (कय 22, रा. सुरकडी, सर्क रा. ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी याबाबत माहिती दिली.

लोणंद ठाण्यातील गंभीर गुह्यांबाबतचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत होता. गेले आठ दिवस चाँद ऊर्फ सूरज पवार याचा पोलीस शोध घेत होते. तो काळज गावच्या हद्दीतील बडेखान येथे असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने साथीदारांसोबत दरोडा, जबरी चोरी, घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पथके करून इतरांची धरपकड केली. न्यायालयाने  संशयितांना पोलीस कोठडी दिल्यानंतर एकेका गुह्याची उकल होत गेली. कारण आरोपींनी एकामागून एक अशाप्रकारे 21 गुह्यांची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार पहिल्या गुह्यातील मुद्देमालापैकी 46 हजार 200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुह्यात कापरलेला कोयता हस्तगत केला. त्यानंतर पुढे आणखी 20 गुन्ह्यातील एकूण 64 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, अर्धा किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 36 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, विजय जाधव, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, दीपाली यादव, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, स्वप्नील माने, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयूर देशमुख, सचिन ससाणे, पंकज बेसके, गणेश कचरे, राजू कुंभार, अजय जाधव, अमित झेंडे, ज्योती शिंदे, महेश पवार यांनी ही कारवाई केली.

सहा महिन्यांत दीड किलो सोने जप्त

 समीर शेख यांनी सातारा जिह्याचा कार्यभार घेऊन सहा महिने झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरींचा सपाटाच लावला आहे. नोव्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, इतर चोरी असे एकूण 67 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 153 तोळे सोने अर्थात दीड किलो सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हा सर्व मुद्देमाल 1 कोटी 33 लाख 76 हजार 830 एवढय़ा किमतीचा आहे.