मुंबई शहरात 89 तर उपनरात 244 उमेदवार

289

मुंबईत शहरात एकूण 89 उमेदवार निवडणूक लढवीत असून पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत तर मुंबई उपनगरात 244 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मुंबई शहरातील 10 मतदारसंघांतील 94 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 89 उमेदवार रिंगणात उरले आहेत. वरळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अमोल निकाळजे, अंकुश कुर्‍हाडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. वरळीत 13, धारावीत 11, सायन कोळीवाडामध्ये 11, वडाळ्यात 6, माहीममध्ये 4, शिवडीत 4, भायखळ्यात 11, मलबार हिल 10, मुंबादेवीत 11,  कुलाब्यात 8  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

उपनगरात 244 उमेदवार

मुंबई उपनगरात 244 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बोरिवलीत 4, दहिसर 8, मागाठणे 9, मुलुंड 13, विक्रोळी 9, भांडुप प. 7, जोगेश्वरी पू. 7, दिंडोशी 10, कांदिवली पू. 6, चारकोप 7, मालाड प. 11, गोरेगावमधून 9, वर्सोव्यात 9, अंधेरी प.8, अंधेरी पूर्व 8, विलेपार्ले 6, चांदिवली 15, घाटकोपर प. 13, घाटकोपर पू. 11, मानखुर्द शिवाजीनगर 10, अणुशक्तीनगर 15, चेंबूर 12, कुर्ला 6, कालिना 14, वांद्रे पू. 13, वांद्रे प. येथून 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या