राज्यातील सवातीन लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा 29 व 30 जानेवारीला संप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
strike

सामना ऑनलाईन, मुंबई

सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे सवातीन लाख चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी 29 व 30 जानेवारी रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. अनुकंपा तत्त्वावरील सेवा भरती विनाअट करावी, वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासकीय सेवेत समाविष्ट करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सरकारी सेवेत सामावून घ्यावे, चतुर्थ श्रेणीमध्ये खासगीकरण नको, ठेकेदारी पद्धती बंद करावी, सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू करावा अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. संपामुळे जे. जे. रुग्णालय, जीटी, कामा, सेंट जॉर्ज आदी सर्वच सरकारी रुग्णालये, औषधालये, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय कँटीन, आचारी, सफाई कर्मचारी, बांधकाम विभाग, कृषी  विभाग या विभागांतील कामकाज ठप्प होणार आहे.