
Redmi चा नुकताच 10 Prime हा स्मार्टफोन हिंदुस्थानात लॉन्च झाला आहे. हा फोन Redmi 9 Prime चा अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. या फोनमध्ये 6 GB चा RAM आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. तसेच फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G 88 प्रोसेसरही असणार आहे. हा फोन बजेट फोन असणार आहे.
Redmi 10 Prime मध्ये RAM आणि इंटर्नल मेमरीमध्ये ग्राहकांना पर्याय देण्यात आला आहे. 4 GBचा RAM आणि 64 GB इंटर्नल मेमरी तर 6 GB RAM आणि 128 GBचा RAM या फोनमध्ये असणार आहे.
फोन साडे सहा इंचाचा असून फूल एचडी डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये गोरिला ग्लास 3 असल्याने फोन अधिक सुरक्षित होणार आहे. Redmi 10 Prime मध्ये मीडिया टेक हिलियोअ G88 प्रोसेसर असणार आहे. तसेच 2 GBचा अतिरिक्त RAMही देण्यात आला आहे. त्यामुळे फोन आणखी फास्ट होणार आहे.
Redmi 10 Prime ची खासियत म्हणजे फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि डेप्थ सेन्सरही देण्यात अला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
4 GB ram आणि 64 GB RAM असलेल्या फोनची किंमत 12 हजार 499 इतकी आहे. तर 6 GB RAM आणि 128 GB इंटर्नल मेमरी असलेल्या फोनची किंमत 14 हजार 499 इतकी असणार आहे.


























































