एक वर्षात 7 कोटी लोक गरिबीच्या गर्तेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक बँकेच्या एका अहवालातून गरिबीबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. 2020 या एका वर्षात जगभरातील 7 कोटी लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले गेल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवले आहे. गरिबीसोबत जगभरात विषमताही वाढल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

जगातील वाढती गरिबी आणि विषमतेबाबत जागतिक बँकेने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये जागतिक गरिबी वाढण्यामध्ये कोविड साथीचा प्रमुख वाटा आहे. मागील काही दशकांमध्ये जागतिक गरिबी निर्मूलनासाठी जे काही प्रयत्न केले, त्या सर्व प्रयत्नांना कोरोनाच्या साथीने मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचा दर लक्षात घेता, 2030 पर्यंत जगातील अति गरिबी संपवण्याचे उद्दिष्ट गाठण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे.