सांगली जिह्यातील 83 प्रकल्पांत 8 टक्के पाणीसाठा; भीषण दुष्काळाचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिह्यातील मध्यम प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. जिह्यातील 83 प्रकल्पांत केवळ 28 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जिह्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांची चिंता जिल्हावासीयांना लागली असून, पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ आली आहे.

गेल्या वर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही उशिरा झाल्या. साधारणतः जून अखेरपासून पेरणीस सुरुवात झाली. रिमझिम पाऊस झाल्याने पिकांची चांगली उगवण झाली. मात्र, पाणीसाठय़ात कुठलीही वाढ झाली नाही. जिह्यात मध्यम आणि लघु 83 प्रकल्प असून, त्याची नऊ हजार 440 दशलक्ष घनफूट पाणी साठविण्याची क्षमता आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या दोन हजार 198 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे.

सिद्धेवाडी (ता. तासगाव), मोरणा (ता. शिराळा), दोड्डनाला, संख (ता. जत), बसाप्पावाडी (ता. कवठे महांकाळ) या मध्यम प्रकल्पांत गतवर्षी 70 टक्के, तर सध्या केवळ 19 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. 78 लघुप्रकल्प असून, त्यामध्ये गतवर्षी 65 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी 31 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या सातारा जिह्यातील धरणांमध्येही पाणीसाठा कमी असल्याने सांगली जिह्यातील म्हैसाळ, टेंभू या योजनांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या कोयनेत 71.26 टीएमसीच पाणीसाठा राहिला आहे. आगामी पाच महिने हे पाणी पुरवावे लागणार आहे. तर धोम आणि तारळीत चांगला साठा असला, तरी आगामी काळात पाणी मागणी वाढणार असल्याने विसर्ग करावा लागणार आहे. सध्या धोम धरणातून 750, तर कण्हेरमधून 175 आणि कोयना धरणातून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे. कोयनेत वीजनिर्मितीसह पिण्याचे पाणी पुरवण्याची कसरत पाटबंधारे विभागाला करावी लागणार आहे.

17 तलाव कोरडे

तासगाव तालुक्यात एक, आटपाडी दोन, जत 11, कवठे महांकाळ तीन असे 17 तलाव कोरडे पडले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील एक, खानापूर तीन, तासगाव एक, जत चार आणि कवठे महांकाळ तालुक्यातील दोन तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. पिण्यासाठी पाणी उपयोगी नाही, अशी स्थिती आहे. यामुळे या परिसरातील पिके वाळली असून, पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.

आटपाडी, जत तालुक्यांतील 54 गावांना टँकरने पाणी

जत तालुक्यातील निगडी खु., शेडय़ाळ, सिंदूर, पांढरेकाडी, कळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सोन्याळ, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, कायफळ, गुगकाड, गिरगाक, संख, जाडरबोबलाद, काराजनगी, उमराणी, तिकोंडी, बेळोडंगी, मोकाशेकाडी, टोणेकाडी, माडग्याळ, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खु., कागनारी, दरीबडची, कोलगिरी, को.बोबलाद, लमाणतांडा, केरेकाडी, क्हसपेठ, खैराक, खंडनाळ, गुलगुंजनाळ, दरिकुणूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजनकाडी, तिल्ल्याळ, गोंधळेकाडी, अंकलगी, मोटेकाडी आदी 50 गाकांमध्ये आणि आटपाडी तालुक्यातील आंबेकाडी, पुजारकाडी, किठ्ठलापूर, उंबरगाक या गाकांसह 54 गाकांमध्ये टँकर सुरू आहेत.