लोअर परळच्या नव्या उड्डाणपुलासाठी 85 कोटींचे टेंडर, दहा महिन्यांत नवा पूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सहा महिन्यांपूर्वी लोअर परळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर पश्चिम रेल्वेने नवा पूल बांधण्यासाठी अखेर टेंडरची प्रक्रिया सुरू केली असून दोन महिन्यांत टेंडर निश्चित होऊन दहा महिन्यांत हा नवा पूल बांधून पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जुन्या पुलाचे गर्डर व पिलर काढण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मोठा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे अनेक उपनगरीय गाडय़ा व एक्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.

नव्या पुलासाठी 85 कोटींचे कंत्राट देण्यात येणार आहे. जुना पूल पाच रेल्वे मार्गिकांवरून जाणार असला तरी भविष्यातील मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावी मार्गिका आखण्यासाठी राखीव जागा सोडावी लागणार असल्याने पुलाच्या रुंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 85 मीटर तिरकी लांबी बाय 37 मीटर रुंदी असणार आहे. तसेच दोन्ही बाजूंना पादचाऱयांसाठी दोन मीटरच्या मार्गिका राखण्यात येणार आहेत.