पावसाचा ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सलग तीन दिवस मुंबसह उपनगराला झोडपणाऱया पावसाने  चौथ्या दिवशी ब्रेक घेतला. अधुनमधून तुरळक सर कोसळता मुंबईत पाऊस नव्हता. ठाण्यातही अशीच परिस्थिती होती. मधूनच सुर्यनारायणही डोकावत होता. जून अखेरीलाही पाऊस सुट्टीवरच असणार असून तीन जुलैपासून तो कामावर परतेल म्हणजेच पाऊस पुन्हा एकदा राज्यभरात सक्रीय होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकण किनारपट्टीला इशारा
येत्या ४८ तासात कोकण किनारपट्टीवर अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वारे ताशी ६० किलोमीटर वेगाने वाहाणार असल्याने मोठय़ा बोटीही समुद्रात भरकटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

म्हणून पावसाची सुट्टी संपणार
डहाणू ते मुंबईदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हा पट्टा आणखी गडद झाला तर मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान तज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले. तर पुढचे तीन ते चार दिवस पाऊस अधुनमधून टुकुटूकू बॅटींग करेल असा अंदाज हवामान विभागाचे वरीष्ठ वैज्ञानिक ए.के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

-मध्य महाराष्ट्रात पुढील ४८ तासात तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
-मुंबईत हवामान ढगाळ राहील. अधुन मधून एखादी तूरळक सर येऊन जाईल.
-कोकण,गेवा, विदर्भ आणि मराठवाडय़ात येत्या २४ तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.