परळीत वैद्यनाथाच्या पायऱ्यांवर दिव्यांची आरास; भाऊबीजेच्या दिवशी दीपोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एस.एम.पाटील । परळी वैद्यनाथ

दिवाळी निमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या दक्षिण पायऱ्यांवर खास दिव्यांची आरास करण्यात आली. यासाठी तब्बल 2 हजार 100 पणत्यांचा वापर करण्यात आला. यासाठी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनीही सेवा दिली.

शुक्रवारी परळीत वैद्यनाथाच्या उत्तर पायऱ्यांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अमर देशमुख, विजय भुतडा, मंगेश चौधरी या तीन मित्रांनी हा उपक्रम राबविला. यासाठी 2100 पणत्या, 4 हजार वाती, 50 भाविक भक्त आणि या संपूर्ण 3 तास लागले. या दीपोत्सवामुळे वैद्यनाथ मंदिर अक्षरशः तेजोमय झाले होते. हे तिन्ही मित्र गेल्या 8 वर्षांपासून हा उपक्रम राबवतात. हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविक भक्तांनी वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर मोठी गर्दी केली होती.