
सामना ऑनलाईन । मुंबई
‘सिंघम’ सीरिजमधील रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. प्रदर्शनानंतर केवळ तीन दिवसांत या चित्रपटाने 131 कोटींची कमाई केली आहे. वर्षाच्या अखेरीस रिलीज झालेला रणवीर सिंह आणि सारा अली खानचा ‘सिम्बा’ चित्रपट यंदाचा सुपरडुपर हिट चित्रपट ठरला आहे. ‘सिम्बा’ने रणवीरच्या ‘पद्मावत’लाही मागे टाकले आहे. हिंदुस्थानसह विदेशातही रिलीज होणारा यंदाचा पाचवा बेस्ट ओपनर चित्रपट ठरला असून आतापर्यंत या चित्रपटाने 131 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘पद्मावत’नंतर ‘सिम्बा’ हा रणवीरचा 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा दुसरा चित्रपट आहे.




























































