‘मोनो’ कर्मचाऱ्यांचा आज संप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-monorail-001

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘मोनो’च्या आधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्कोमी इंजिनीअरिंगने आज दिलेल्या संपाच्या हाकेमुळे ‘एमएमआरडीए’ने सावधान होत कामगारांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे. पगार वेळेवर होत नसल्याने स्कोमी इंजिनीअरिंगचे कर्मचारी असलेल्या आणि सध्या ‘एमएमआरडीए’मध्ये सामावून घेतलेल्या कर्मचाऱयांनी संपाचा इशारा दिला आहे. चेंबूर ते वडाळादरम्यान धावणाऱया मोनोचे व्यवस्थापन मलेशियन स्कोमी कंपनीकडून 14 डिसेंबर रोजी एमएमआरडीएने आपल्या ताब्यात घेतले आहे. वडाळा ते सातरस्ता हा मोनोचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेले अपयश तसेच नादुरुस्त गाडय़ांचे पार्टस् खरेदी करण्यात झालेली दिरंगाई व नव्या गाडय़ा खरेदीचे टेंडर काढण्यास लावलेला उशीर यामुळे एमएमआरडीएने मोनोचे व्यवस्थापन पाहणाऱया स्कोमी इंजिनीअरिंग कंपनीला हाकलून लावले. दरम्यान, संप करू नका. याप्रकरणी कामगारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.