
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकल प्रवासात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. ओम सिंग असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी ती मुलगी मित्रांसोबत मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातून मुलुंड येथे जात होती. तेव्हा ओमने तिला नकोसा स्पर्श केला. भांडुप स्थानक आल्यावर मुलीने ओमला खाली उतरवले. त्याला कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी ओमला ताब्यात घेऊन दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून ओमला अटक केली.



























































