ट्रक उलटल्याने मुंबई- नाशिक महामार्ग ठप्प, गाड्यांची लांबच लांब रांग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident-common-image

सामना प्रतिनिधी । ठाणे

भिवंडी जवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच सोमवारी पहाटे ट्रक उलटून झालेल्या अपघातानंतर शेकडो गाड्यांच्या काही किलोमिटरच्या रांगा दोन्ही बाजुने लागल्या आहे.