
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकशाहीची मूल्ये धोक्यात आली आहेत, असे परखड मतप्रदर्शन सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ए. के. सिक्री यांनी काल केले. मोदी सरकारकडून देशातील लोकशाही संस्थांना धोका निर्माण झाला आहे, अशी टीका विरोधकांकडून होत असतानाच न्या. सिक्री यांनीही लोकशाही मूल्ये धोक्यात आल्याची टीका केल्याने खळबळ उडाली आहे.
गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या नवव्या दीक्षांत सोहळय़ात पदवीधरांसमोर प्रमुख पाहुणे सिक्री हे बोलत असताना त्यांनी ही टीका केली. आपण एका स्थित्यतरामधून जात आहोत. जगाकडे तुम्ही पाहा असे सांगून न्या. सिक्री पुढे म्हणाले, 2500 वर्षांपूर्वी या जगाला ग्रीकने लोकशाहीची मूल्ये दिली. ती मूल्येच आज धोक्यात आहेत. लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होत आहे.

























































