1 / 7
हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती 6.5 अब्ज इतकी आहे.
सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या चेअरमन आहेत. जिंदाल ग्रुपच्या स्टील, पॉवर, सीमेंट आणि पायाभूत सूविधा क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आहेत.
सावित्री जिंदाल या दिवंगत उद्योगपती ओम प्रकाश जिंदाल यांच्या पत्नी असून सज्जन आणि नवीन जिंदाल यांच्या आई आहेत. त्यांनी हरयाण सरकारमध्ये मंत्री म्हणून ही राजकारणात कार्य केले आहे.
हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत महिलांच्या दुसऱ्या स्थानावर आहेत बायोकॉनच्या किरण मुजुमदार - शॉ. यांची संपत्ती 3.6 अब्ज इतकी आहे.

























































