
सामना ऑनलाईन । मुंबई
गुगलच्या सेवेतील तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील नेटकरी आज हैराण झाले आहेत. जीमेल सेवा अत्यंत धिम्या गतीनं सुरू असल्याचे आज पाहायला मिळाले. ई-मेल न येणे, सोबत जोडलेल्या फाईल डाऊनलोड न होणे अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे गुगलची सोवा कोलमडली आहे. गुगल ड्राइव्ह, जीमेल, तसेच यू-ट्यूबच्या सेवेत देखील त्यामुळे युजर्सना अडचणी येत असून अनेक व्यवहार खोळंबले आहेत.
Google’s Gmail and Drive suffer global outages https://t.co/V9i25N2v0o
— The Guardian (@guardian) March 13, 2019
गुगलची सेवा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना बुधवारी सकाळीच गुगलनेमोठा धक्का दिला आहे. नेटकऱ्यांनी गुगलच्या तांत्रिक अडचणींच्या तक्रारी सोशल मीडियावर केल्या आहेत. गुगलने या तक्रारींची दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. युजर्सना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच सेवा पूर्ववत होईल असा खुलासा देखील गुगलकडून करण्यात आला आहे.


























































