
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत उन्हाचा पारा चांगलाच तापला असताना उपनगरात वारंवार वीज गायब होत आहे. विक्रोळीत गेल्या काही दिवसांत अदाणी कंपनीकडून कुठलेच कारण न देता तासनतास लोडशेडींग केले जात आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ऐन रात्रीच्या वेळी वीज जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. या भागात दोन तीन तास वीज पुरवठा नसतो. विक्रोळीच्या टागोर नगर, हरियाली व्हिलेज मध्ये रहिवासी भागासह मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांच्याही व्यवसायायावर परिणाम होत आहे.
ही वीजपुरवठा का खंडीत केला जातो याचे नेमके कारण कंपनीकडून स्पष्ट केले जात नाही. अनेक वेळा फोन करून एक ठराविक वेळ दिली जाते. परंतु कधी कधी वेळ उलटूनही वीज पुरवठा सुरळीत होत नाही. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


























































