भादा येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

औसा तालुक्यातील भादा येथील शिवदास विष्णू गायकवाड (42) या शेतकऱ्याचा शनिवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

शिवदास विष्णू गायकवाड हा शेतकरी दुपारी 2 च्या सुमारास आपल्या शेतातील डीपीमध्ये फ्युज बसवण्यासाठी गेला असता करंट लागल्याने त्यास जखमी अवस्थेत उपचारासाठी लातुर येथील रुग्णालयात नेले होते. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.

पाऊस नसल्याने आपल्या शेतातील बंद पडलेले विद्युत कनेक्शन चालू करून शेताला विद्युत पंपाद्वारे पाणी देण्यासाठी गेलेला शिवदास वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.