सफरचंदाच्या एका फोडीबरोबर कोट्यवधी बॅक्टेरिया जात आहेत तुमच्या पोटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
apple

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

 ‘अॅन अॅपल अ डे किप्स डॉक्टर्स अवे’ असे बोलले जाते. सफरचंदातील गुणांमुळेच डॉक्टर रुग्णांना रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देताना दिसतात. पण ऑस्टीयाच्या ग्रेज युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या संशोधकांनी सफरचंदाच्या एका फोडीबरोबर 10 कोटी बॅक्टेरिया पोटात जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

संशोधकांच्या मते हे बॅक्टेरिया शरीरासाठी घातक आहेत की नाही हे मात्र त्यांच्या उत्पनांवर अवलंबून आहे. इतर फळांच्या तुलनेत सफरचंदांमध्ये सर्वाधिक बॅक्टेरिया असतात. यातील काही शरीरासाठी हानिकारक असतात तर काही फायदेशीर. जर तुम्ही सेंद्रीय सफरचंद खात असाल तर ते निश्चितच तुमच्या शरीरासाठी उपयुक्त आहे. कारण यात संतुलित बॅक्टेरिया असतात. जे सफरचंदाला चविष्ट आणि उपयुक्त बनवतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

तर दुसरीकडे हे बॅक्टेरिया बुरशी आणि विषाणूच्या माध्यमातून जेवणातून आपल्या आतड्यापर्यंत पोहोचतात. पण अन्न शिजवताना त्यातील बरेच विषाणू मरतात. पण फळ आणि कच्च्या भाज्यांचा सेवनातून ते थेट पोटात जातात. असे जर्नल फ्रंटीयरमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात नमूद करण्यात आले आहे. संशोधकांच्या मतानुसार परंपरागत आणि सेंद्रीय सफरचंदामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण सारखेच असते. 240 ग्राम सफरचंदामध्येच जवळजवळ 10 कोटी बॅक्टेरिया असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.