
फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटरसमोरच्या परिससरात असलेले एक चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून चोरून नेले आहे. ही घटना गुरुवारी रात्री तीन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पर्यवेक्षक अभिजित जाधव यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर समोरील पटांगणात चंदनाचे झाड होते. गुरुवारी रात्री तीन ते सव्वातीनच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधून आलेल्या तीन चोरट्यांनी हे झाड कटरच्या सहाय्याने कापून त्याचा बुंधा चोरून नेला आहे. त्यानंतर चोरटे कॅनॉल रोडने ज्ञानेश्वर पादुका चौकाच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.





























































