
हिंदुस्थानात कोविडशिल्ड लसीला परवानगी मिळावी यासाठी सिरम व ऑक्सफर्ड़ इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांटी केंद्र सरकारच्या एक्सपर्ट समितीसोबत बैठक सुरू आहे. कोविडशिल्डला तत्काळ परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हिंदुस्थानाकत कोविडशिल्डला परवानगी मिळू शकते असे बोलले जात आहे.
ब्रिटीश कंपनी एस्ट्राजेनेकाच्या लसीला मंजुरी देणारा हिंदुस्थान हा पहिला देश ठरणार आहे. देशात या लसीची निर्मिती सिरम इन्स्टिटय़ूट करीत आहे. ब्रिटनमध्ये अद्याप या लसीच्या चाचण्यांसंबंधी डेटा पडताळला जात आहे. सरकारने जानेवारीत व्यापक लसीकरण मोहिम सुरू करण्याचा निर्धार केला आहे. याच अनुषंगाने कोविशिल्ड लसीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून तातडीने मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळून लसीकरण वेळीच सुरू झाल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यात मोठे यश मिळणार आहे.
फायझर इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनीही कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे. या कंपन्यांनाही लवकरच मंजुरी दिली जाण्याची चिन्हे आहेत. भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिन या पूर्णपणे स्वदेशी लसीची निर्मिती करीत आहे.



























































