
शहरात कोरोनाचा संसर्ग वाऱयाच्या वेगाने फैलावत आहे. दोन दिवसांत कोरोना बाधितांची संख्या 250 पेक्षा जास्त आढळली. धक्कादायक म्हणजे 31 कुटुंबांत कोरोनाची लागण झाली असून 80 जण बाधित झाल्याचे आढळले आहे.
लातुरात दोन दिवस जनता कर्फ्यू
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लातूरकरांनी शनिवार, रविवार हे दोन दिवस उत्स्फूर्त जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे. हे दोन दिवस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये अशी सूचना त्यांनी केली. बीड जिल्हय़ातील शाळा, कॉलेज 10 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी घेतला आहे.

























































