जम्मू कश्मीरमधील कृष्णा ढाबाच्या मालकाच्या मुलाचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्यात झाला होता जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील सुप्रसिद्ध कृष्णा ढाबा च्या मालकाचे पुत्र आकाश मेहरा याचा मृत्यू झाला आहे. 11 दिवसांपूर्वी त्याच्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश याच्या पोटाला आणि हाताला गोळी लागली होती. त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. पण अथक परिश्रमानंतरही राजेशला वाचवण्यात अपयश आले. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

कृष्णा ढाबाचे मालक राजेश मेहरा यांचा मुलगा राजेश मेहरा 25 वर्षाचा होते. 17 फेब्रुवारी रोजी जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी हला झाला होता. तेव्हा दहशतवाद्यांच्या गोळीबारात राजेश गंभीर जखमी झाला होता.  राजेशला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणार्‍या तेन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून पिस्तूल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.