
म्यानमारमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच चिघळत आहे. रविवारी यंगून परिसरातील हैंगथाया येथे आंदोलनकर्त्यांनी एका चिनी कंपनीला आग लावली. या घटनेनंतर तेथील सैन्याने केलेल्या तुफान गोळीबारात 22 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
गेल्या सहा आठवडय़ांपासून सुरू असलेला हा आंदोलनातील सर्वात वाईट दिवस असल्याचे वृत्त एजन्सी रायटर्सने दिले आहे. म्यानमारमध्येही अन्य ठिकाणीही आंदोलने सुरू असून या आतापर्यंत 16 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे तर एका पोलीस अधिकाऱयाचाही मृत्यू झाला आहे.

























































