
तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली आहे. तहानलेला कावळा चंबूत एक-एक खडा टाकतो. चंबूच्या काठावर पाणी आल्यानंतर ते पिऊन तो आपली तहान भागवतो अन् भुर्रकन उडून जातो. काळानुसार आता कावळादेखील स्मार्ट झाला आहे. आपली तहान भागवण्यासाठी तोदेखील नवनवीन टेक्निक वापरत असल्याचे दिसतेय.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालतोय. त्यात कावळा चक्क चोचीने नळ उघडून आपली तहान भागवताना दिसतोय. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटवर शेअर केल्यानंतर काही क्षणांतच तो व्हायरल झाला आहे. तहानलेल्या कावळ्याचा हा स्मार्टनेस पाहून नेटिझन्स अचंबित झाले आहेत.




























































