कोरोना लस उत्पादन वाढविण्यासाठी सिरमला 3000 कोटी रुपयांची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात मोठय़ा प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे कोरोना लसींची मागणाही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यातच हिंदुस्थानात लसीचे उत्पादन करणारी एक प्रमुख पंपनी असणाऱया सिरम इन्स्टिटय़ूटला कच्च्या मालाबरोबरच निधीची कमतरता भासत आहे. उत्पादन वाढविण्यासाठी सिरमला 3000 कोटी रुपयांची गरज असल्याचे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्या या मागणीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मागणी आणि पुरवठय़ाबाबत सहा महिन्यांपूर्वीच नियोजन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

सिरम इन्स्टिटय़ूट एस्ट्राजेनका आणि ऑक्सफर्ड यांच्यासोबत संयुक्तपणे कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सिरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये करत आहे. सध्या महिन्याला सहा ते साडेसहा कोटी डोसचे उत्पादन सुरू आहे. लसीची गरज लक्षात घेता सध्याची उत्पादन क्षमता वाढवून दर महिन्याला 10 ते 11 कोटींपर्यंत नेण्याच उद्दिष्ट पंपनीने समोर ठेवले आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कच्च्या मालाची गरज आहे. लसनिर्मितीसाठी हजारो कोटी रुपये आपण यापूर्वीच खर्च केले आहेत. त्यामुळे यापुढे उत्पादन वाढवायचे तर 3000 कोटींची गरज आहे. एवढी मोठी रक्कम उभारण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा विचार होण गरजेचे असल्याकडे अदर पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून सरकारचे लक्ष वेधले आहे.

सरकारच्या म्हणण्यावरून कमी दरात लस उपलब्ध करून देत आहोत. यातून आम्हाला अधिक नफा होत नाही जो पुन्हा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोरोना लसीचे उत्पादन करणारी जगातील कोणतीही पंपनी एवढय़ा कमी दरात लस देत नाही.
– अदर पूनावाला, सिरम

लस तयार करण्यासाठी अंदाजे 1500 रुपये (20 डॉलर्स) खर्च येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विनंतीवरून हिंदुस्थानात 150 ते 160 रुपयांमध्ये ती उपलब्ध करून दिली जाते.

हिंदुस्थानात सिरमकडून आतापर्यंत 10 कोटींहून अधिक डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. अन्य देशांत 6 कोटी डोस निर्यात करण्यात आले आहेत.

उत्पादन क्षमतेबाबत सहा महिने आधी सर्व गोष्टींचा विचार करायला हवा होता. यासाठी कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नाही. मागणी आणि पुरवठा याबाबत प्रत्येक उत्पादकाला अंदाज असतोच. कोरोना लसीची गरज फक्त हिंदुस्थानलाच आहे असे नाही, तर संपूर्ण जगाला आहे.
– डॉ. रणदीप गुलेरिया, एम्स