रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाने 29 जणांची ऑनलाइन फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेमडेसिवीर इंजेक्शन स्वस्त दरात देतो सांगून एका महिलेची ऑनलाइन फसवणूक करणाऱया भामटय़ाला टिळकनगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपीने अशा प्रकारे 29 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

टिळकनगर येथील सहकार सिनेमाच्या बाजूला राहणाऱया मेघना ठक्कर यांचे ओळखीचे असलेल्या चेतन मिस्त्र्ााr यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. हे इंजेक्शन एकजण उपलब्ध करून देतो असे मेघना यांना त्यांच्या मैत्रिणीने सांगितले होते. त्यानुसार रूपेश गुप्ता याचा संपर्क क्रमांक मेघना यांना मिळाला होता. मेघना यांनी रूपेश गुप्ताला संपर्क साधून रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणी केली. गुप्ताने इंजेक्शन उपलब्ध करून देतो असे सांगितले. मेघना यांनी चेतन मिस्त्राr यांना तसे सांगून रूपेशला गुगल पेद्वारे 18 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार चेतन यांनी रूपेशला 18 हजार गुगल पे केले. त्यानंतर रूपेशने डिलिव्हरी बॉयकडून बनावट इंजेक्शनच्या बाटल्या मेघना यांच्या घरी पाठवल्या. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाने आलेला बॉक्स मेघना यांनी उघडला असता आत भलत्याच औषधाच्या बाटल्या होत्या.

याप्रकरणी मेघना यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून टिळकनगर पोलिसांनी रेमडेसिवीरच्या नावाने बनावटगिरी करणाऱया रूपेशला शोधून बेडय़ा ठोकल्या. रूपेशने अशा प्रकारे 29 जणांची फसवणूक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी सांगितले.