
पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री धरणातून 25 हजार क्यूसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. (सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)

पाण्याच्या प्रचंड वेगामुळे मुठा नदीतील जलपर्णी वाहून जाताना डेक्कन येथील बाबा भिडे पुलाला अडकली.

रस्त्यावर जलपर्णीचा डोंगर तयार झाल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.

शुक्रवारी सकाळपासून महापालिकेचे कर्मचारी ही जलपर्णी हटवण्याचे काम करत आहेत.

मुठा नदीची पाणी पातळी वाढल्याने काम बंद असून रस्ता वाहतुकीसाठी अद्याप खुला करण्यात आलेला नाही.





























































