
इसिसमध्ये सहभागी झालेल्या आपल्या मुलीला हिंदुस्थानात परत येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केरळच्या एका महिलेने न्यायालयाकडे केली आहे. बिंदू संपत यांची मुलगी निमिषा उर्फ फातिमा इसिसमध्ये दाखल होण्यासाठी 2016 मध्ये अफगाणिस्तानात गेली होती. त्यानंतर तीन वर्षांनी 2019 मध्ये तिने अफगाणी सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. तेव्हापासून ती आपल्या मुलीसह अफगाणिस्तानातील तुरुंगात आहे. तिला हिंदुस्थानात परत येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मगणी करत संपत यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
आपली मुलगी निमिषा आणि चार वर्षांच्या नातीला देशात परत आणण्यासाठी बिंदू संपत प्रयत्न करत आहेत. या मागणीसाठी संपत यांनी केरळ न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अफगाणिस्तानात तुरुंगात असलेली मुलगी आणि नात यांना देशात परत आणण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. संपत यांनी या आधी दाखल केलेली हेबियस कॉर्पस याचिका मागे घेत दुसरी रिट याचिका दाखल करण्याची न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यामुसार संपत यांनी ही रिट याचिक दाखल केली आहे. त्यात त्यांनी ही मागणी केली आहे.
अफगाणिस्तानातील खोरासन प्रांतात इसिस या दहशतवादी संघटनेत दाखल होण्यासाठी 2016 मध्ये निमिषा पतीसह गेली होती. त्याआधी तिने धर्मपरिवर्तन करत इस्लाम धर्म स्वीकारला. त्यावेळी तिचे नाव बदलून फातिमा ठेवण्यात आले. अफगाणिस्तानात गेल्यावर तीन वर्षांनंतर फातिमासह काही महिलांनी अफगाणी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर ती आपल्या चार वर्षांच्या मुलीसह अफगाणिस्तानच्या तुरूंगात आहे. त्यांची देशात परतण्याची इच्छा आहे. त्यामुळे सरकराने त्यांनी परतण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संपत यांनी केली आहे.
अफगाणिस्तान सरकार त्यांना हिंदुस्थानात पाठवण्यास तयार आहे. मात्र, केंद्र सरकारने त्यांना परत घेण्यास नकार दिला आहे. मुलीच्या आणि नातीच्या परतीच्या परवानगीसाठी संपत यांनी केंद्रीय गृह व परराष्ट्र मंत्रालय तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल मदतीची मागणी केली आहे. मात्र, आपल्या मुलीबाबत त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
आपली मुलगी फातिमा आणि नात देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार नाहीत. निमिषा इसिस या दहशतवादी संघटनेत दाखल झाली होती. मात्र, त्यानंतर तिने आतमसमर्पण केले आहे. त्यामुळे त्यांना देशात परत येण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी संपत यांनी केली आहे. त्यांच्याकडून देशाला नुकसान पोहचणारे कोणतेही कृत्य होणार नाही, असे आश्वासनही संपत यांनी दिले आहे.



























































