जालन्यातील आरतखेडा फाट्याजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील जाफराबाद -भोकरदन रस्त्यावरील आरतखेडा फाट्याजवळ जाफराबादकडे येत असतांना ट्रँक्टर पलटी होवुन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत चेतन अनिल धोत्रे (12) रा. चिखली ता. रिसोड जि. वाशीम व गणेश मारोती निंबोळे (16) रा. मोप ता. सेनगाव जि. हिंगोली (हल्ली मुक्काम जवखेडा ता. जाफराबाद) हे दोघेही जागीच ठार झाले.

या घटनेची माहीती मिळताच जाफराबाद पोलीस ठाणे येथील एन.टी.खारडे, आर.व्ही. डोईफोडे, ए.के.शेजुळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात सदरील मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. हे दोन्ही युवक हे खाजगी कंत्राटदार यांच्याकडे डब्बर फोडन्याचे काम करत होते. याबाबत जाफराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यन्त गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.