
एसटी कर्मचाऱयांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांची दिवाळीपूर्वी सोडवणूक व्हावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांना पत्र लिहून केली आहे.
एसटी कर्मचाऱयांना तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकतर्फी वेतनवाढ देऊन मोठा आर्थिक दिलासा दिला होता. एकतर्फी वेतनवाढ देताना जाहीर केलेल्या परिपत्रक क्रमांक 27/2018 नुसार पेंद्र शासनाच्या कर्मचाऱयांप्रमाणे महागाई भत्त्याचा दर, राज्य शासनाच्या कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य शासनाच्या कर्मचाऱयांप्रमाणे वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्ता दर देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे पेंद्र व राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱयांना जाहीर केलेला 28 टक्के महागाई भत्त्याचा दर लागू करणे, वार्षिक वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने 2 वरून 3 टक्के करणे, घरभाडे भत्त्याचा दर 8 टक्के, 16 टक्के, 24 टक्केप्रमाणे एसटी कर्मचाऱयांना दिवाळीपूर्वी मिळवून देण्यासाठी खासदार अरविंद सावंत यांचे निवेदन परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, कार्याध्यक्ष विजय मालोकार, प्रदीप धुरंदर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड उपस्थित होते.




























































