हिंदुस्थानात पहिले भव्य सेंट्रल किचन उभे राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sats

सॅटसने हिंदुस्थानमध्ये सेंट्रल किचनचे बांधकाम सुरू केले आहे. 20 हजार चौरस मीटर किचन केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट, बेंगळुरू येथे उभारण्यात येत आहे. हे हिंदुस्थानातील सर्वात मोठे आणि अनोखे किचन असणार आहे.

या किचनमध्ये पौष्टिक, चविष्ट, सुरक्षित अन्न तयार करण्यासाठी ऑटोमेशन आणि स्मार्ट तंत्रज्ञान याचा समावेश करण्यात येणार आहे. ऑटोमेटेड राइस लाइन, जे तासात जवळपास 600 किलो विभिन्न अन्न पॅक करू शकते. यासाठी आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

हे हिंदुस्थानातील पहिले एलईईडी प्रमाणित फ्रोजन फूड उत्पादन केंद्र आहे. इथे होणाऱ्या सर्व कामावर नियंत्रण आणि देखरेख ठेवता येते. कोविड-19 चा प्रादूर्भाव लक्षात घेत सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे.